About us

मनोहर नाइक यांचा थोडक्यात परिचय.

संमोहनशास्त्रातील ४५ वर्षांचा अनुभव आणि मानसशास्त्राचा दांडगा व्यासंग. हिप्नोहीलिंग थेरपी, योगशास्त्र आणि त्राटक साधनेचा अभ्यास.
शास्त्रीय संमोहानाचा अडीच ते तीन तासांचा अत्यंत मनोरंजक कार्यक्रम करतात. भारतभर हजारो यशस्वी कार्यक्रम केले आहेत.
शैक्षणिक, सामाजिक आणि धार्मिक संस्थांसाठी सवलतीत कार्यक्रम देतात.
संमोहनशास्त्री, अंधश्रद्धा, स्मरणशक्ती, मनाची एकाग्रता इत्यादी विषयांवर शेकडो शैक्षणिक संस्थांत व्याख्याने दिली आहेत.
मानसशास्त्रीय पद्धतीने संपूर्ण हिप्नॉटिझम केवळ आठ दिवसात थेअरी आणि प्रॅक्टिकलसह गॅरेंटीपूर्वक शिकवतात.
व्यक्तिमत विकासासाठी, अत्मासंमोहन शिकविण्याची ४ दिवसांची शिबिरे.
गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, स्नेहसंमेलनासाठी हिप्नॉटिझमचे मनोरंजक कार्यक्रम करतात.
मनोहर नाईक यांची लिहिलेली एकूण ४३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आणखी पंधरा पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.

चमत्कारांचं आकर्षण कुणाला नसतं ? कधीही नृत्य न शिकलेली कुणी मुलगी अचानक सुंदर पदन्यास करू लागते, एखादा मुलगा कधीही न शिकलेल्या भाषेत धडाधड बोलू लागतो, वर्षानुवार्षे तोतरे बोलणार्‍या कुणा गृहस्थाची वाणी स्वच्छ होते, कुणाचे जुनेपुराणे दुखणे औषधपाण्यावाचून नाहीसे होते...
असे चमत्कार कोणी घडवतं? असे चमत्कार घडू कसे शकतात? छे, छे हा कुणी बुवा नव्हे किंवा हे कसलेही चेटूक नव्हे. हे सारे चमत्कार आहेत- संमोहन विद्येचे. तुमच्या आमच्या अंतर्मनाच्या अगाध सामर्थ्याचे. त्यासाठी 'संमोहन' समजून घ्यायला हवं. त्याबद्दलचे सारे गैरसमज दूर करायला हवेत. संमोहन हे एक शास्त्र आहे आणि त्याचा वापर ही एक कला आहे. या कलेत वाक्बगार असलेले संमोहनतज्ज्ञ मनोहर नाईक यांचा ४५ वर्षांचा प्रदीर्घ व्यासंग आहे.