Stage Show

Stage Shows / Programmes / Functions

अंतरमनाच्या प्रचंड सामर्थ्याचे विलक्षण दर्शन घडविनारा, क्षणाक्षणाला हशा आणि टाळ्या घेणारा नाविन्यपूर्ण आणि अत्यंत मनोरंजक कार्यक्रम.

संमोहित (हिप्नोटाइझ) झालेल्या २५ ते ४० प्रेक्षक अंतर्मनाच्या अचाट शक्तीच्या सहायाने स्टेजवर आश्र्चर्यकारक प्रयोग करतात. सिनेनृत्य, ब्रेकडान्स, डिस्को, लावणी, कोळी, कथ्थक, गरबादी नृत्ये करतात. काल्पनिक क्रिकेट खेळतात व ऑर्केष्ट्रा वाजवितात. बाहुलीशी खेळताखेळता दूधही पितात. सौदर्य व शरीरसौष्ठ स्पर्धेत भाग घेतात. कडू कारली गाजर समजून कचाकच खातात. क्षणात दुःखाने रडतात, तर क्षणात खळखळून हसतात. कितीही गुदगुल्या केल्या तरी होत नाहीत. पण काल्पनिक गुदगुल्यांनी मात्र खूप बेजार होतात. पशुपक्षांचे आवाज काढतात, गाणी म्हणतात. तसेच अतिंद्रीय शक्ती, कार्यसाधक शक्ती व सहनशक्तीचे चमत्कारही करून दाखवितात.
नेहमी पेक्षा वेगळा, प्रेक्षकांना सतत हसत ठेवणारा आणि परत परत पाहावा असे वाटणारा, सर्वत्र तुफान हाऊसफुल गर्दीत चालणारा तीन तासांचा सुंदर दर्जेदार कार्यक्रम . (कार्यक्रमाच्या शेवटी मनोहर नाईक सर्व प्रेक्षकांना स्वयंसूचना व मनोबल वाढविण्याच्या सूचना देतात. सर्वाना त्या सूचनांचा जीवनात खुपच फायदा होतो.